loader image

आ. सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेसाठी विविध सुविधांचे लोकार्पन

Sep 7, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

आ. सुहास कांदे यांचा वाढदिवस आज साजरा न करता जनतेच्या हिताकरिता जनतेसाठी विविध सुविधांचे वस्तूंचे लोकार्पण केले .

लोकार्पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले

लोकार्पण करण्यात आलेल्या विविध वस्तूंमध्ये जलरथ (पाण्याचे टँकर) शंभर अपंग बांधवांसाठी सायकल तीन रुग्णवाहिका एक मोफत फिरता दवाखाना एक मोफत शासकीय कार्यालय दोन वैकुंठ रथ अशा साधनांचे लोकार्पण आज करण्यात आले
या सर्व वाहनांचे विधिवत पूजा आ. सुहास कांदे अंजुमताई कांदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
यावेळी प्रत्येक वाहनाची विधिवत पूजा करण्यात आली.
या पुजे करिता प्रत्येक वाहनाजवळ स्वतंत्र पुरोहित यांनी उपस्थितांकडून पूजा करून घेतली.

या प्रसंगी मतदारसंघातून आलेले मान्यवर व्यक्ती तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यानंतर आ. सुहास कांदे यांनी निवासस्थानी आलेल्या नागरिकांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी वाढदिवसनिमित्त कोणतेही हार तुरे पुष्पगुच्छ व भेट आमदारांनी स्वीकार केली नाही .
हजारो नागरिकांनी निवासस्थानी आमदारांची भेट घेतली.

या प्रसंगी आमदार आपल्या दारी अभियान अंतर्गत साकोरी येथील ५० जेष्ठ नागरिकांना निराधार योजनेचे सर्टिफिकेट आमदारांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, मा .आ.राजाभाऊ देशमुख, केदा नाना आहेर, डॉ.कुंभार्डे, राजाभाऊ अहिरे, राजेश कवडे, साईनाथ गिडगे, राजाभाऊ पगारे, अल्ताफ बाबा खान, राजाभाऊ पवार, विलास आहेर, तेज दादा कवडे, फरहान दादा खान,आबा इनामदार, रमेश बोरसे, सुभाष कुटे, अर्जुन पाटील, अनिल रिंढे, बाळकाका कलंत्री, दिलीप इनामदार, युनूस शेख , महावीर पारख, बबलू पाटील, प्रकाश घुगे, सतीश पाटील, राजेंद्र वाल्मीक पवार, मयूर बोरसे, सुनील हांडगे, विष्णू निकम सर, एकनाथ सदगिर, दत्तराज छाजेड, पंकज खताळ, महेंद्र दुकले, संग्राम बच्छाव, एन के राठोड, राकेश ललवाणी, अमजद पठाण, देविदास मोरे, गोकुळ कोठारी, आबा देवरे, किरण देवरे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, नंदू पाटील, डॉ.सुनील तुसे, राजाभाऊ देशमुख, संजय आहेर, बाळासाहेब आव्हाड, किशोर लहाने, अंकुश कातकडे, सुनील जाधव, भावराव बागुल, कैलास भाबड, अशोक डगळे, समाधान पाटील, चेतन पाटील , काळू शिंदे, सचिन साळवे, कातकडे साहेब उत्तम व्हडगळ, कपिल तेलुरे आदींसह
शिवसेना, युवासेना, महिला आघाडी
पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.