loader image

सोन्याची चेन चोरणारा जेरबंद – पाच गुन्ह्यातील अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Sep 7, 2023


 

मनमाड : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची मनमाड रेल्वे स्थानकात सोनसाखळी अज्ञात चोरट्याने ओरबडून नेली. याबाबत प्रवासी अजय भावसार (रा. दुर्गपूर, राजस्थान) यांनी प्रवाशाने मनमाड रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संशयितास अटक केली असता त्यांच्याकडून अन्य पाच गुन्ह्याची उकल झाली आहे. यावेळी सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिली आहे.

मनमाड-पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या अजय भावसार यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी अनोळखी इसमाने तोडून नेल्यानंतर भावसार यांच्या फिर्यादीवरून मनमाड पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल
आणि रेल्वे पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाचे विश्लेषण करून यातील संशयित प्रवीण श्रीमंत काळे यांस ताब्यात घेऊन गुन्ह्याविषयी विचारपूस केली. त्यानंतर संशयिताने गुन्हा

उघड करण्यात आला. त्यामुळे एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयित आरोपीकडून एकूण पाच गुन्हे उघड झाले. यात अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कामगिरी लोहमार्ग छ. संभाजीनगर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक संपत राठोड, सुरेश सोनवणे, दिनेश पवार, रवींद्र खडतकर, महेंद्र पाटील, संतोष भालेराव, सुशील भावसार, किशोर कांडले, अमोल खोडके, राज बच्छाव, मनजीत पाटील व संदीप देस्वाल, धर्मेंद्र यादव, सागर वर्मा, मनीष कुमार, दीपक सानप

केल्याचे कबूली दिली. १५ ग्रॅम वजनाची सोन्याचे साखळी लगड स्वरूपात हस्तगत केली तसेच त्याच्याकडून रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड येथे दाखल असलेले इतर तीन जबरी चोरीचे गुन्हे यांच्या पथकाने केली.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.