loader image
[ays_poll id=7]

जे.टी.कासलीवाल इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालगोपालानी साजरा केला गोपालकाला- दहीहंडी उत्सव

Sep 7, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल च्या प्रागंणात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्सवात संपन्न झाला.श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी विद्यार्थ्यांनी समूह नृत्य,श्लोक पठन तसेच नृत्याविष्कारातून विविध श्रीकृष्णाच्या लिला सादर केल्या. श्रीकृष्ण व राधेच्या विविध वेशभूषेतील चिमूरड्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर ठेकाधरीत आपल्या नृत्यविष्काराची प्रचिती उपस्थित पालक व शिक्षकांना दिली. प्राचार्य श्री मणी चावला यांनी दहीहंडीची पुजा केली व लहानग्या बालगोपालांनी मोठ्या जल्लोषात दहीहंडी फोडली. फोडलेल्या दहीहंडीतील प्रसाद गोपालकाला म्हणून सर्व विद्यार्थ्यांना वाटण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांना श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्ताने संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबकाका कासलीवाल, महेंद्र भाऊ चांदीवाल, प्रशासक प्रकाश गुप्ता , प्राचार्य श्री. मनी चावला सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.