बालविकास प्रकल्प नाशिक नागरी 2 अंतर्गत मनमाड विभागातील अंगणवाडी क्रमांक 81 मध्ये एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण माह या कार्यक्रमांतर्गत गोकुळ अष्टमी साजरी करण्यात आली.सुपोषित भारत,सक्षम भारत,सुशक्त भारत या थीम नुसार पोषण माह ची जनजागृती करण्यासाठी बालकांना गोकुळ अष्टमी निमित्त वेशभूषा करून आहारातील विविधता,सुदृढ़ बालक भावी देशाची संपत्ती यासाठी विविध कार्यक्रमातून मा.प्रकल्प अधिकारी श्री पगारे सर,मुख्यसेविका शितलं गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अं. सेविका सीमा चौधरी सहकार्य मदतनीस मनीषा वाघ यांनी केले.
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...












