loader image

नांदगावला एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Sep 12, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास करणारे गणितीय शिक्षण एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून नांदगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली आहे असे प्रतिपादन सेवा निवृत्त शिक्षक विजय काकळीज यांनी नांदगाव येथे संपन्न झालेल्या एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी केले.
एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी द्वारा आयोजित २२ व्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटीशनचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी येथील गुप्ता लॉन्स मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करण्यात येवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश नारायणे, प्राचार्य मनी चावला, भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, सेवा निवृत्त शिक्षक विजय काकळीज, अशोक घडेकर, पत्रकार अनिल आव्हाड, महेश पेवाल उपस्थित होते.
एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी द्वारे रविवार (दि. १०) रोजी सकाळी अकरा वाजता नांदगाव केंद्रावर २२ व्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटीशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नांदगाव, निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यानंतर दुपारी परी‌क्षेचा निकाल जाहीर करण्यात येवून यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या संचालिका कल्पना गडेकर यांनी केले, सुत्रसंचलन सुवर्णा आव्हाड यांनी केले तर आभार निशिगंधा काकळीज यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाम गाडेकर, सिद्धार्थ सोनवणे, शिक्षीका गीता बिसेन, सोनाली खैरनार यांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.