loader image

पावसासाठी तृतीयपंथी यांनी यल्लमादेवी कडे केली प्रार्थना….

Sep 13, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव येथील तृतीयपंथी अनिता जोगी,आग्नेशगुरु यांच्या निवासस्थानी श्री यल्लमा देवीचा श्रावणी पाणी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्ह्यातील व तालुक्यातील तृतीयपंथी समाजाचे वरिष्ठ गुरुवर्य महामंडलेश्वर पार्वती नंदगरी जोगी धुळे,महंत निलू जोगी,महंत श्रीमंत ऋषिकेश जोगी,कालिदास महाराज ,दीपक भाऊ नाशिककर, भरत सोनार,रेणुका जोगी,दीपा जोगी,सनम कुवर,नाजूका जोगी स्वरा जोगी,किरण जोगी,योगिता आदी तृतीयपंथी समाजातील प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.

श्रावणी पाणी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने यल्लमा देवीची आकर्षक सजावट करुन पारंपारिक वाद्याच्या गजरात नांदगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील भाविकांनी यल्लमा देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. तृतीयपंथी समाजाचे आराध्य दैवत यल्लमा देवीची आरती गावातून भव्य अशी मिरवणूक झाल्यानंतर करण्यात आली.

यांचे गायन नृत्य मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.निलू जोगी व स्वरा जोगी यांनी देवीच्या उत्कृष्ट गीत गायनाने, नृत्य कलाकृतीने व अदाकारीने उपस्थित नागरिकांचे मने जिंकली.पावसाळा सुरू होऊन तीन ते चार महिने होत आहेत. या साठी पाऊस पडावा यल्लमा देवी कडे तृतीयपंथीनीं प्रार्थना केली.आम्हाला आणि मुक्या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळुदे, भरपूर पाऊस पडू दे, प्रत्येक मनुष्य सुखी राहू दे,शेतकऱ्यांची चिंता दूर व्हावी अशी प्रार्थना तृतीयपंथी यांनी केली.या वेळी पंचक्रोशीतील यल्लमा देवीचे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.