राजस्थान येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील जवान योगेश सुखदेव शिंदे हे बैल पोळा सणानिमित्त घरी आले होते.
काल दिनांक 15-9-2023 रोजी काही कामानिमित्त वनसगाव मार्गावर दुचाकीने जात असताना पिकअप गाडीने समोरासमोर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा, भाऊ भावजई असा परिवार आहे . त्यांचा मृतदेह देवळाली येथे रात्री हलवण्यात आला.
त्यांचा अंत्यसंस्कार शासकिय इतमामात करण्यात येणार आहे.
योगेश शिंदे यांच्या अपघाती निधनाने खडक माळेगाव,परिसरात गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
भारतीय रेल्वे 554 स्टेशनच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन विकास योजने मध्ये मध्य रेल्वे भुसावळ मंडलातील रापली अंडरपास निर्माण विकास कामाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीने द्वारे शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम संपन्न
अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत संपूर्ण देशात भारतीय रेल्वे द्वारे 554 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास...











