चांदवड तालुक्यातील मौजे रायपुर गावअंतर्गत आतिक्रमण वाढ होत असून रहिवाशी ग्रामस्थांमध्ये तक्रारीचे प्रमाण वाढत चालले आहे. यापुर्वी झालेल्या ग्रामसभेत विषय सुचित करून अतिक्रमण काढणे बाबत चर्चा करणेत आलेली होती मात्र संबंधित प्रशासनाने अद्यापपावोत्ती दखल घेतली नाही.
सदर दाखल केलेल्या निवेदनाप्रमाणे आपल्या स्तरावर तत्काळ कार्यवाही करून गावअर्तगत अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे ह्या मागणीसाठी रायपूर येथील रहिवासी हौशिराम पूंजाबा गुंजाळ आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.











