मनमाडची लाईफ लाइन गोदावरी एक्सप्रेस 12117 आणि 12118 कोविड- 2019 नंतर आजपर्यंत सुरू झालेली नाही. यात्री संघटनेने मनमाड स्टेशन प्रबंधक आणि भुसावळ मंडळ कार्यालयात अनेक वेळा अर्ज देऊनही रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक उत्तर दिलेले नाही. चाकरमाने, शेतकरी,विद्यार्थी, व्यवसायी, सरकारी कर्मचारी, खाजगी कंपनी कर्मचारी आणि इतर अनेक यात्री मनमाड हून नाशिक, इगतपुरी आणि मुंबई ला जाण्यासाठी ह्या गाडीला प्राधान्य देतात मात्र गोदावरी एक्स्प्रेस अद्याप पावेतो सुरू करण्यात आलेली नाही.
यात्री संघटनेने माहिती एकत्र केली आहे.
या निवेदनाद्वारे रेल्वे प्रशसनाला पुन्हा एकदा मागणी करत आहोत की गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन नरेंद्र खैरे, संदीप व्यवहारे, भडके आदींनी भुसावळ प्रबंधकांना देण्यात आले.
साईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची भारतीय संघात निवड
आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी याची सलग सहव्या वेळेस भारतीय संघात निवड करण्यात आली असून...








