मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय नाशिक जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा आणि यूंग मुन दो स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूनी १७ वर्षातील ५७ किलो खालील गटात कु पियुष मोरे, ५७ किलो वरील गटात कु अवधेश पारिक तर १९ वर्षातील ४० किलो गटात कु स्नेहल बंद्रे , ५२ किलो गटात कु गायत्री कदम व ६४ किलो गटात कु अनुराग वाघमारे यांनी सुवर्णपदक संपादन केले. या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ स्मिताताई हिरे, समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते अद्वयआबा हिरे, विश्वस्त मा. संपदादीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एन. निकम, क्रीडा शिक्षक श्री महेंद्र वानखेडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन केले.
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण
मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...










