loader image

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मोर मृत्युमुखी

Sep 18, 2023

येवला तालुक्यातील कातरणी व चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु शिव शिवरस्त्या लगत राहत आसलेले
श्री भाऊसाहेब बाळा कदम कातरणी यांच्या गट नंबर 59 मध्ये आज दि. 18/09/23 रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दोन कुत्र्यांच्या हल्ल्यात लांडोर जखमी झाले. कुत्र्यांनी त्याचा एक डोळा निकामी केला मोराच्या सर्वांगावर मोठ्या प्रमाणात चावा घेऊन जखमी केले होते. सोमनाथ यांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते निसर्ग प्रेमी भागवत झाल्टे कातरवाडीकर यांना दिली असता झालटे यांनी वन विभाग कर्मचारी वनरक्षक सोनाली वाघ मॅडम चांदवड यांना संपर्क करून सविस्तर माहिती दिली त्यांनी त्वरित आपले वनविभाग कर्मचारी भाऊसाहेब झाल्टे व बाळू सोनवणे यांना पाचारण करत लांडोर मोराला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी तळेगांव येथील शासकीय रुग्णालयात आणले परंतु उपचारा दरम्यान मोराचा मृत्यू झाला त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली
त्या ठिकाणी भाऊसाहेब कदम अंकुश रसाळ रवी कदम समाधान गोजरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. मोकाट श्र्वानाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा कारण ते इतके हिंस्र झाले आहे की माणसावरती पाळीव प्राण्यांवरती मोठ्या प्रमाणात हल्ला करत आहे त्यामुळे यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी झाल्टे यांनी केली आहे

अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.