loader image

हिसवळ खुर्द येथे रेशन कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न

Sep 22, 2023


हिसवळ खुर्द येथे आज आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रयत्नातुन ११८ नवीन रेशनकार्ड विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने त्याचे वाटपाचा कार्यक्रम आज गणपती मंदिर सभागृहात पार पडला याप्रसंगी मनमाडचे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते राजेंद्र पवार, सदस्य , डॉ.विजय कदम,माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, माजी सभापती सुधीर देशमुख, माजी सभापती किशोर लहाने, माजी सभापती अंकुश कातकडे,सोपान बिन्नर,सागर आहेर मांडवड, आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संजय आहेर यांनी केले,या प्रसंगी त्यांनी पुढील कामांची माहिती सांगितली आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रयत्नातुन आजपर्यंत गावात पूर्ण झालेली व मंजूर कामे जवळपास दोन कोटी रुपयांची आहेत तर अनेक कामे प्रस्तावित आहेत. कृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून एकाच वेळी दोनशे शेततळे करण्याचा निर्धार या गावाने केला आहे. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र मंजूर आहे. या ठिकाणी तीन वर्षांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू होत आहे. यामुळे परिसरातील अठरा वर्षा वरील वयोगटातील मुलांना प्रशिक्षण घेण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे यावेळी माजी सरपंच विजय आहेर, मोहनदादा आहेर, विश्वास आहेर, मुकुंद बाबा पालीमकर, ग्रामपंचायत सदस्य- नानासाहेब आहेर, संतोष आहेर, संदिप कदम,सुदाम आहेर,संदिप आहेर, संदिप लोखंडे, ग्रामसेवक मनिष भाबड, विशाल काळे, रितेश आहेर, मंगेश आहेर, सुरेश सोळसे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार आपल्या दारी अंतर्गत मोफत शासकीय सुविधा कार्यालय कमध्यमातून विविध शासकीय दाखले व रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जात आहेत,
आता पर्यंत हजारो नागरिकांना मोफत रेशन कार्ड व विविध दाखले उपलब्ध करून देण्यात आले आहेत


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.