loader image

मनमाड केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन तर्फे जागतिक औषधनिर्माता दिवस साजरा

Sep 25, 2023


आज २५/०९/२०२३ सोमवार रोजी “जागतिक औषधनिर्माता दिवस २०२३” , मनमाड केमिस्ट एंड ड्रग्गिस्ट असोसिएशन तर्फे विविध उपक्रम खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन सर्व औषधनिर्माता यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. जिल्हा परिषद शाळा शिवाजी नगर क्रमाक.१, नेहरू भवन शाळा व आश्रम शाळा निमोन रोड, डोणगाव येथे शालेय साहित्य वाटप व प्रथम उपचार किट विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच ग्रंथसाहिब गुरुद्वारा, बस स्टैंड व पोलिस स्टेशन, मनमाड येथे प्रथम उपचार किट व गरजे चे औषधे मोफत वाटप करण्यात आले. मनमाड केमिस्ट एंड ड्रग्गिस्ट एसोसिएशन च्या वतीने नांदगाव तालुका EC मेंबर सुनील बोगावत, माजी EC मेंबर विनोद मुनोत तालुका अध्यक्ष सचिन लुणावत, माजी तालुका अध्यक्ष मनेश काकलीज व योगेश ताथेड, मनमाड केमिस्ट असोसिएशन चे शहर अध्यक्ष समीर निकम, उपाध्यक्ष सोहेलभाई जाफरी, उपाध्यक्ष निखिल लुणावत, सचिव प्रशांत आहेर, सहसचिव मनिष कुंजरकर, संघटनेचे आधारस्तंभ व बुलंद तोफ देवेंद्र गवांदे, किरण रसाळ, रवींद्र वासकर व आसिफभाई खान यांच्या शुभ हस्ते विविध उपक्रमांना सरअंजाम देण्यात आला. औषधनिर्माता हा देशाचा एक समाजरत्नच होय व त्याचा कार्य हे समाज घडवण्यात किती मोलाचे असते हे ह्या उपक्रमा द्वारे सार्वजनिक रित्या सर्वांना सांगण्यात आले. औषधनिर्माता व त्यांचे सहकारी जिवन खताळ, अमोल देवरे, सचिन राऊत, पियुष भंडारी, रितेश ललवाणी व इतर मान्यवर उपस्थित होते. मनमाड पोलिस निरीक्षक थोरात यांनी केमिस्ट संघटनेचे कौतूक करुन, औषधनिर्माता देशाचा व समाजाचा किती महत्वाचा घटक असतो हे सांगून संघटनेची पाठ थोपटली.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.