अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका महिला अध्यक्ष पदी
सौ.चंद्रकला राजेंद्र बोरसे तर अखिल भारतीय समता परिषद महिला शहराध्यक्ष पदी सौ.सुगंधा दिलीप खैरनार यांची नाशिक येथे समता परिषद संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ साहेब, दिलीप अण्णा खैरे, बाळासाहेब कर्डक, समता परिषद महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष योगिता ताई पाटील, जया खैरे, वंदना साबळे,शोभा बोरसे, राजेंद्र बोरसे, संजय खैरनार,अनिता जाधव, सुनिता खैरनार,किसनाबाई खैरनार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वांनी चंद्रकला ताई व सुगंधा ताई यांना मनपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...









