बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे श्री. चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शना खाली पोषण वाटीका,परसबाग तयार करणे तसेच संगोपन व संवर्धन करणे विषयी मार्गदर्शन करण्यात आले.. अंगणवाडी केद्र परीसरात उपलब्ध जागेनुसार शेवगा,कडीपत्ता,पपई,पेरू,सिताफळ,भोपळा,पुदीना,फळझाडे,भाजीपाला,फळभाज्या औषधी वनस्पती,इतरही झाडाची लागवड करुन परस बाग तयार करून त्यांचे संगोपन व संवर्धन करणे विषयी किशोरी,महिला,माता,लाभार्थी वर्ग यांना मार्गदर्शन करण्यात आले.
. परस बाग ,पोषण वाटीकासाठी जागेची मर्यादा नाही ..गच्चीवर,अंगणात,कुंडीत ही पोषण वाटीका करता येते.कमी कालावधीत फळे,भाजीपाला घरच्या घरी मिळविण्यास मदत होते. तसेच ताज्या हवेसह उत्तम प्रतीचा प्राणवायु मिळण्यास मदत होते. काही औषधी वनस्पतीची लागवड कुंडीत करता येते. तसेच पालकांना परस बाग,पोषण वाटीकाची लागवड करतांना सेद्रींय पध्दतीने करण्यास सांगितले.
सांडपाण्याची विल्हेवाट करुन छान परस बाग,पोषण वाटीका फुलवता येईल. अशा रीतीने मार्गदर्शन गृहभेटीच्या माध्यमातुन करण्यात आले.
मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार
मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय...









