loader image

मनमाड शहरात लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप

Sep 30, 2023


मनमाड : योगेश म्हस्के – शहरातील गणेश भक्तांकडुन आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्ती-भावाने निरोप देण्यात आला , घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही उत्साह दिसून येत होता. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांच्या वतीने भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा संपन्न झाला.

शहरामध्ये काल विसर्जन सोहळ्या प्रसंगी लहान-मोठया गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते , नागरिकांनी आपल्या बाप्पाचे अत्यंत मनोभावे विसर्जन पार पाडले. सकाळी मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि वेशीतील मानाचा गणपती श्री निलमणी गणेशाची पारंपरिक पद्धतीच्या मिरवणूकने विसर्जन सोहळा संपन्न झाला. शहरातील अनेक मानाची गणेश मंडळे , घरगुती गणपती यांचे मध्यरात्री पर्यंत गणेशकुंड येथे विसर्जन संपन्न झाले.

यंदाच्या वर्षीच्या विसर्जन सोहळ्यामध्ये सर्वात आगळी-वेगळी विसर्जन मिरवणूक ठरली ती गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाच्या ‘गोदावरीचा राजा’ गणपतीची , गेल्या 27 वर्षांपासून मनमाड ते मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांकडुन कदाचित देशातील एकमेव असणारा चालत्या प्रवासी रेल्वेगाडी मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे , यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने तीन चाकी सायकल रिक्षा वरती आकर्षक अशी सजावट करून बाप्पा विराजमान केले होते तर हा रथ चालवण्यासाठी चक्क मुशकराज रथाचे सारथ्य करत होते .या मिरवणुकी मध्ये पारंपरिक ढोल पथक , बँड पथक , घोडे आणि मंडळाच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी पारंपारिक वेषभूषा करून बाप्पाची अत्यंत सुंदर आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढुन मनमाडकरांची मने जिंकली.


अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.