मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीम पुनम डी मढे ह्या होत्या . तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते. श्रीम निश्चित मॅडम व गायकवाड मॅडम आदींनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. यावेळी महात्मा गांधीजींचे आवडते भजन रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम ह्याचे गायन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीम सोनाली निश्चित यांनी केले.

श्री.देव हिरे यांना आदर्श कलाशिक्षक (विशेष पुरस्कार)२०२५ देऊन सन्मान
रावसाहेब थोरात सभागृह ,नाशिक येथे आज दि.२२ सप्टेंबर २०२५ राजी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ...