loader image

मनमाड नगर परिषद तर्फे जनजागृती रॅली संपन्न

Oct 8, 2023


मनमाड – (प्रतिनिधी) मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी , आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रोगराईच्या पार्श्वभूमीवर व शासन निर्णय नियमाअंतर्गत प्लास्टिक कॅरीबेग पिशव्याच्या वापर करू नये याबाबतीत आरोग्य विभागाच्या वतीने रॅली जनजागृती प्रभागातील सुपरवायजर राजेंद्र धिंगाण , संजय बहोत ,प्रभाग प्रमुख सुरज चावरीया, संतोष वानखेडे,बाळू सकट अधिपत्याखाली स्वच्छ सर्वेक्षण २०२३ माझी वसुंधरा मेरी माटी मेरा देश या अंतर्गत मनमाड नगर परीषद मार्फेत जनजागृती रॅली आयोजीत करण्यात आली होती.सदर कार्यक्रमास मनमाड नगर परिषदेचे कर्मचारी सह आरोग्य प्रभाग प्रमुख आणी कर्मचाऱ्यानी
शहरातील विविध भागामध्ये स्वच्छता मोहीम सह कर्मचारी आणी नागरीकाशी संवाद साधून जनजागृती केली.
या सर्व भागामध्ये एकूण विवीध भागधारकांची कचरा वर्गीकरण याबाबतीत संवाद साधून जनजागृती केली.
या सर्व भागधारकांना कचऱ्याचे घटक समजावून सांगण्यात आले. ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा तसेच यामध्ये येणाऱ्या घटकांची सविस्तर माहिती दिली.

1)जो कुजतो तो *ओला कचरा* ओल्या कचरामध्ये फळांच्या साली, अंड्याची टरफले, उरलेले शिळे अन्न, मटण आणि चिकन व त्याची उरलेली हाडे, चहा पावडर, पानांची पत्रावळी, फुले व फुलांचे हार, केसांची गुंतावळ, नारळाची करवंटी, भाज्यांचे देठ, पालापाचोळा, पाने, शेंगाची टरफुले, उसाचा चोथा, गवत, फांद्या, मक्याचे कणीस, गव्हाचा कोंडा, इत्यादी घटकांचा समावेश होतो.

2) जो कुजत नाही तो *सुका कचरा* याचा पुनर्वापर होऊ शकतो यामध्ये पुठ्ठा, प्लास्टिक, कागद, प्लास्टिक बॉटल, कपडे, जुने चप्पल/बूट, सिरॅमिक वस्तू, लोखंड, थर्मकोल, चॉकलेट/बिस्कीट ची रॅपर, रिकामी दूध पिशवी, इत्यादी घटकांचा समावेश होतो.

3) *घातक कचरा* यामध्ये सिरीज, वापरलेले ब्लेड, सॅनिटरी पॅड/नॅपी, फुटलेले ब्लब, प्रेग्नन्सी किट, खराब बॅटरी/सेल, मुदत सम्पलेली गोळ्या व औषधे, फुटलेल्या काचा व इत्यादी घटकांचा समावेश घातक कचऱ्यामध्ये होतो.
घातक कचरा हा घंटागाडी हेल्पर कडे कागदात गुंडाळून वेगळा करून द्यावा अशी माहिती सांगितली.

कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा तसेच तो इकडेतिकडे उघड्यावर किंवा कचराकुंडीत टाकू नये, अशी माहिती स्वच्छता कर्मचाऱ्याना सांगण्यात आली. यावेळी सागर आहीरे , विजयघुगे , राजू खलसे , शशी धिंगान , उमेशचुनियान , भास्कर हरी , मुकेश साळवे, , अतुल शिंदे , निखील करोसीया , अर्जुन बेद , धर्मा पाथरे , , प्रकाश पाथरे , भारत त्रिलोक,. उमेश चुनियान , भास्कर दिबंर , संतोष जाधव , संतोष चव्हाण सुमेध विलास अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.