loader image

नांदगावची आर्या कासलीवाल हिची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

Oct 9, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव शहरातील प्रसिद्व व्यापारी रिखबकाका कासलीवाल यांची नात व युवा उद्योजक समीर कासलीवाल यांची कन्या कुमारी आर्या हिची राज्यस्तरीय कॅरम स्पधैसाठी निवड करण्यात आली.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत १४ वर्षाखालील विभागस्तरीय कॅरम स्पर्धा नुकत्याच शिरपूर येथे मोठया उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत नाशिक विभागातील ६४ खेळाडूनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत येवला येथील विद्या इंटरनॅशनल खेळाडू आर्या समीर कासलीवाल हिने ज्वहेरी अन्सारी धुळे,श्रेया माहालपुरे जळगाव, बिनी फातीया मालेगाव,अरूण सोळसे जळगाव या खेळाडूवर अंत्यत शांत व संयमाने कलात्मक गुणांचा खेळ करून विजय प्राप्त केला. या विजयामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली. तिच्या या नेत्रदिपक कामगिरी बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील धुळे,जिल्हा प्रभारी क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, येवला तालुका क्रीडा संयोजक नवनाथ उंडे,नांदगाव युवा उद्योजक आनंद कासलीवाल,अमोल नावंदर,सचीन पारख,सोमनाथ घोगांणे , नुतन कासलीवाल आदीनी आर्या हिचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.