loader image
[ays_poll id=7]

मांडवड येथे भाजपा तर्फे मेरी मिट्टी मेरा देश अभियान संपन्न

Oct 9, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे भाजपा तर्फे मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविण्यात आले. भाजपाच्या जेष्ठ नेत्या एड जयश्रीताई दौंड यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या नांदगाव तालुका अध्यक्षा (भालूर) सौ. मंदाकिनी भारत काकड यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. राजेंद्र शामराव आहेर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद वीर व वीरांगना यांच्या सन्मानार्थ मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत संपूर्ण देशात सुरू केलेल्या अमृतकलश यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते त्यास प्रतिसाद म्हणून नांदगाव भाजपा तर्फे हे अभियान राबविण्यात आले. भारत माता की जय, वंदेमातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.या प्रसंगी शेतकरी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष श्री. सजन तात्या कवडे, माजी तालुका अध्यक्ष श्री बळीरामजी निकम, नांदगाव तालुका अध्यक्ष (साकोरा) श्री गणेश शिंदे, जेष्ठ नेते भगवान सोनवणे, श्री आनंदराव घाडगे पाटील, श्री नामदेव शिंदे, डॉ. बी. के. आहेर, विठ्ठल आबा आहेर, अशोक राव आहेर, राजेंद्र भाऊ काजळे, सचिन थेटे, सचिन गाठबांधे, सुखदेव चव्हाण,भारत काकड सर तसेच मांडवडचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.