मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभाग अंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रवीण व्यवहारे उपस्थित होते. आपल्या मनोगतातून त्यांनी मनमाड महाविद्यालयाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडविले आहे असे मत व्यक्त केले. भारतात खेळांसाठी व खेळाडूंसाठी पोषक वातावरण तयार होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाकडे व व्यायामाकडे जास्त लक्ष द्यावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम निकम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग घेतला पाहिजे, व रोज एक तास आपला आवडता खेळ खेळावा तसेच व्यायामासाठी वेळ दिला पाहिजे, मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर गडाख डॉ. सुरेखा दफ्तरे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ सुहास वराडे सर्व संघप्रमुख, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, कुलसचिव , सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जितेंद्र वाले यांचा सत्कार
रोटरी क्लब तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेले विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. जितेंद्र श्रावण...











