loader image

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत नऊ रंगांवर आधारित पाककृती उपक्रमाचे आयोजन

Oct 15, 2023


नवरात्रीचे औचित्य साधून बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) उल्हासनगर अंतर्गत नऊ रंगांवर आधारित पाककृती व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) उल्हासनगर अंतर्गत २१७ अंगणवाडी केंद्र कार्यान्वीत आहेत.दिनांक १५ आॕक्टोबर २०२३ ते दिनांक २३ आॕक्टोबर २०२३ या कालावधीत नवरात्रीचे औचित्य साधून प्रकल्प कार्यक्षेत्रात नऊ रंगांवर आधारित पाककृती व इतर उपक्रमांचे आयोजन केल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी अजय फडोळ यांनी दिली..सदर कालावधीत उपक्रम घेण्यासाठी आयुक्तालयाकडून प्राप्त पत्र प्रकल्पातील सर्व अंगणवाडीताई, मदतनिसताई यांना देण्यात आलेले आहे.यात दैनंदिन पाककृती व इतर उपक्रमांचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे.त्यानुसार तसेच इतरही नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे.या पत्रात नमुद केल्याप्रमाणे नवरात्री सणाचे औचीत्य साधून नऊ रंगांची पोषक पाककृती व या रंगांवर आधारित विविध उपक्रम राबविले जाणार आहेत..यावेळी रांगोळी, पाककला, किशोरवयीन मुलींसाठी निबंध, चित्रकला, अंगणवाडीतील बालकांसाठी रंग आधारित वेशभुषा,प्रश्न मंजुषा इ. स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे..रंगांवर आधारित पाककृतींचे चित्र प्रदर्शन, अंगणवाडीतील बालकांचे गरबा न्यृत्य इ. चे आयोजन केले जाणार आहे..विविध रंगांची फळे, पालेभाज्या, डाळी, कडधान्य, भरडधान्य, ७ अन्नगट इ.च्या माध्यमातून लाभार्थींच्या पालकांना योग्य पोषणाचे महत्व सोप्या पद्धतीने पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे…यासाठी सर्व अंगणवाडीताई व सर्व मदतनिसताई यांना विजया कुंभार, शोभा चौगुले, सुषमा केणी, श्रृतिका मोहिते या मुख्यसेविका मार्गदर्शन करत आहेत.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.