मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख वक्ते प्रा डॉ. डी व्ही. ठाकोर यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन संपन्न झाले. आपल्या व्याख्यानात डॉ. ठाकोर यांनी आरोग्य, पैसा, आणि वेळ यांचे महत्त्व आपल्या विनोदी शैलीत विद्यार्थ्यांना पटवून दिले. आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी श्रमाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. जे. आर. पालवे, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य पी. के. बच्छाव, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुरेखा निकम, प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, प्रा चैतन्य ठाकोर पाहुण्याचा परिचय प्रा.सुमित वाघ यांनी केले.

राशी भविष्य : १२ सप्टेंबर २०२५ – शुक्रवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....