loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – हिसवळ खुर्द येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न

Oct 20, 2023

नांदगाव तालुक्यातील हिस्वळ खु येथे
प्रमोद महाजन उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन गुरुवारी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस उद्योजकता,व कौशल्य विकास मंत्री ना. मंगल प्रभात लोढा आदींच्या उपस्थितीत पार पडले यावेळी हिसवळ खुर्द येथील दत्त मंदिर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी गटनेते श्री राजेंद्र पवार, मनमाड चे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, योगेश(बबलू) पाटील, मा.जि.प.सदस्थ डॉ.विजय कदम, बाजार समितीचे मा.सभापती किशोर लहाने, डॉ.वाघचौरे साहेब, सरपंच कैलास फुलमाळी,उपसरपंच संजय आहेर, सदस्य -नानासाहेब आहेर, संदिप आहेर,बंडुकाका आहेर,सुदाम आहेर, सरस्वती लोखंडे, ग्रामसेवक मनिष भाबड, तलाठी ननई, नांदगाव येथील आयटीआय कॉलेजच्या प्राचार्य कुलकर्णी मॅडम, आदिंसह गावातील परिसरातील ग्रामस्थ, महिला,विद्यार्थी,शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण केंद्रा मार्फत येथे सोलर टेक्निशियन चा अभ्यासक्रम लवकरच सुरू होत आहे. प्रशिक्षण केंद्र परम स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे. नांदगाव तालुक्यात हिसवळ खुर्द व वेळगाव अशा दोन ठिकाणी आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून ती मंजूर करण्यात आले आहे. आमदार सुहास कांदे यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित जि.प. गटनेते राजेंद्र पवार यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय आहेर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.