loader image

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमराणेत विदयार्थी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Oct 20, 2023


मनमाड :- श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे प्रभारी प्राचार्य डॉ.कैलास खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शक श्री. जयवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशीय विद्यार्थी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जयवंत पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणकोणते पर्याय विदयार्थ्यास उपलब्ध होतात. या विषयी सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य यांनी ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना परिश्रम करण्याची सवय असते. त्यामुळे आपण जर पदवी वर्गाच्या पहिल्या वर्षांपासून आपले ध्येय निश्चित केले. तर पूर्णत्वास नेता येते. याचे महत्व पटवून दिले.
या वेळी प्रा.डॉ.एस.डी.अहिरे, प्रा.कु.देवरे के.डी.,प्रा.एम.एम.गावित,प्रा.जी. आर.धूळसैंदर जी.आर. व कार्यालयीन सेवक आणि विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.डी.अहिरे यांनी व प्रा.कु. देवरे के. डी. यांनी आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.