loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे यांच्या वाढदिसानिमित्त आरोग्य शिबिर व व्याख्यानाचे आयोजन

Oct 21, 2023

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीचे सरचिटणीस माजी परिवहन मंत्री समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थेच्या सर्व शाखांमधील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयात या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय मनमाडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, जनरल फिजिशियन व भूलतज्ञ डॉ. कविता कातकाडे उपस्थित होत्या. आपल्या मनोगतातून त्यांनी आरोग्याच्या समस्या व आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज व्यायाम, योगासने, संतुलित आहार इत्यादी बाबींवर चर्चा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी आपल्या मनोगतातून समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे यांना वाढदिवसानमित्त शुभेच्छा देऊन त्यांनी शिक्षणाबरोबरच सहकार, कृषी, सामाजिक, राजकीय, जलव्यवस्थापन व नियोजन अशा अनेक विविध क्षेत्रात डॉ. प्रशांतदादा हिरे यांनी केलेल्या कामगिरीची माहिती सांगीतली.
याप्रसंगी महाविद्यालयात उपस्थित असलेले सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी डॉ. कविता कातकडे यांनी केली. या शिबिरासाठी प्रा. पंडित खताळ, श्री.एस एन खैरनार, श्री. आर. आर. पवार आदी सेवानिवृत्त कर्मचारी, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी. एस. देसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सौ. जे. आर. पालवे, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांनी केले. या शिबिराचे संयोजनासाठी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे.डी वसईत यांचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
.