loader image

मनमाड येथे २८ आॕक्टोबर रोजी काव्य-कोजागिरी

Oct 23, 2023


मनमाड(प्रतिनिधी)- – येत्या शनिवारी ,२८आॕक्टोबर रोजी सायं.सहा वाजता येथील इंडियन हायस्कूलच्या लोकमान्य सभागृहात काव्य-कोजागिरी हा कवीसंमेलनाचा बहारदार कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा आस्वाद काव्यरसिकांनी घ्यावा असे आवाहन बहुजन समाज प्रबोधन समिती,मनमाड यांनी केले आहे.या काव्यमैफीलीदरम्यान केसरमिश्रित दुग्धपानाचा आस्वादही उपस्थितांना घेता येणार आहे.
बहुजन समाज प्रबोधन समिती नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांतून जनमानस प्रबोधनाचाचे उपक्रम शहरात आयोजित करीत असते.त्याचाच एक भाग म्हणून शनिवार ,दि.२८आॕक्टोबर रोजी सायं ६-०० वा. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने हा काव्य-कोजागिरी कार्यक्रम ज्येष्ठ कवी व रक्तकर्ण श्री .प्रदीपजी गुजराथी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.ज्येष्ठ कवी प्राचार्य श्री.सदाशिव सुतार,सौ.मंदोदरी पाटील,गझलकार श्री.काशिनाथ गवळी, प्रा.श्री.सुरेश नारायणे,पत्रकार श्री.अमोल खरे,सौ.विनयाताई काकडे,सौ.प्रतिभा खैरनार,श्री.हेमंत वाले,श्री.शाम शिंदे यांचेसह युवाकवी श्री.राजू लहिरे,श्री.धनराज दौंड,श्री.शांताराम वाघ आदींच्या कवितांनी हि काव्यमैफील सजणार आहे.तर कवी,प्रकाशक श्री.संदीप देशपांडे हे या मैफीलीचे सूत्रसंचलन करणार आहेत.
या काव्यमैफिलीत रसिक-श्रोत्यांना पौर्णिमेच्या चांदण्यात दुग्धपानाचाही आस्वाद घेता येणार आहे.
बहुजन समाज प्रबोधन समितीचे अध्यक्ष अॕड.श्री.जावेद शेख ,सचिव श्री.एस.एम.भाले व या कार्यक्रमाचे संयोजक साहित्यिक श्री.जनार्दन देवरे यांनी या कार्यक्रमास काव्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले समय-दान द्यावे असे आवाहन एका पत्रकान्वये केले आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.