मेष : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. सुसंवाद साधाल.
सिंह : वाहने जपून चालवावीत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
तूळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
धनू : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.