बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) उल्हासनगर अंतर्गत २१७ अंगणवाडी केंद्र कार्यान्वीत आहेत.दिनांक १५ आॕक्टोबर २०२३ ते दिनांक २३ आॕक्टोबर २०२३ या कालावधीत नवरात्रीचे औचित्य साधून प्रकल्प कार्यक्षेत्रात नऊ रंगांवर आधारित विविध पौष्टिक पाककृती बनवीणे व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सदर कालावधीत उपक्रम घेण्यासाठी आयुक्तालयाकडून प्राप्त पत्र प्रकल्पातील सर्व अंगणवाडीताई, मदतनिसताई यांना देण्यात आलेले होते.यात दैनंदिन विविध पौष्टिक पाककृती व इतर उपक्रमांचे वेळापत्रक देण्यात आलेले होते.त्यानुसार तसेच इतरही नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याची मुभा संबंधितांना देण्यात आलेली होती.या पत्रात नमुद केल्याप्रमाणे नवरात्री सणाचे औचीत्य साधून नऊ रंगांवर आधारित विविध पौष्टिक पाककृती व या रंगांवर आधारित विविध उपक्रम प्रकल्प कार्यक्षेत्रात विभागांमध्ये व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात आले.यावेळी रांगोळी, पाककला, किशोरवयीन मुलींसाठी निबंध, चित्रकला, अंगणवाडीतील बालकांसाठी रंग आधारित वेशभुषा,प्रश्न मंजुषा, भोंडला, उखाणे स्पर्धा, रंगांवर आधारित विविध पौष्टिक पाककृतींचे चित्र प्रदर्शन, अंगणवाडीतील बालकांचे गरबा न्यृत्य इ.चे आयोजन करण्यात आले होते…विविध रंगांची फळे, फळभाज्या, पालेभाज्या, डाळी, कडधान्य, भरडधान्य, ७ अन्नगट इ.च्या माध्यमातून लाभार्थींच्या पालकांना योग्य पोषणाचे महत्व सोप्या पद्धतीने पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला…या कालावधीत जनतेचाही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्यात आला..अंगणवाडी ताई, मदतनिसताई यांच्या सोबतच लाभार्थींचे पालक व विभागातील इतरही महिलांनी विविध पौष्टिक पाककृती बनवून त्याचे फायदे उपस्थितांना समजावून सांगितले.सहज उपलब्ध होवू शकणाऱ्या स्थानिक पदार्थांचा वापर करुन स्थानिक पौष्टिक पाककृती बनविण्यवर भर देण्यात आला.नवरात्र उत्सवातील या उपक्रमांसाठी पालक, लोक प्रतिनिधी, समाजसेवक, स्वयंसेवी संस्था,शिक्षण,आरोग्य विभाग, यांनीही सक्रिय सहभाग नोंदविल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी अजय फडोळ यांनी दिली..या उत्सवासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व अंगणवाडीताई व सर्व मदतनिसताई यांना उत्सवात विविध पौष्टिक पाककृतींची प्रभावी जनजागृती करण्यासाठी विजया कुंभार, शोभा चौगुले, सुषमा केणी, श्रृतिका मोहिते या मुख्यसेविकांनी मार्गदर्शन केले.

राशीभविष्य : १५ ऑक्टोबर २०२५ – बुधवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....