नांदगाव सोमनाथ घोगांणे
हिंदुराष्ट्राच्या पवित्र भूमीत पुन्हा एकदा प्रभू श्रीरामरायाच्या व छत्रपती शिवरायांच्या आर्शीवादाने भगव्या ध्वजाचे राज्य लवकरच यावे यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान नांदगाव विभाग तर्फे नवरात्र निमित्ताने श्री दुर्गा माता दौड चे आयोजन करण्यात आले . या दौड चे यंदाचे हे नववे ९ वर्ष असून नवरात्री उत्सवा दरम्यान दररोज पहाटे निघणा-या या श्री दुर्गा माता दौडमध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले .
आदिशक्ती माता श्री तुळजाभवानी चरणी देश, धर्माच्या स्वत्वस्वाभिमानासाठी, भारतमातेच्या रक्षणासाठी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर शंभूराजांच्या आणि अगणित धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या अंगी असणारे शौर्य, साहस प्रत्येक हिंदूच्या अंगी यावेत असे मागणे तुळजाभवानी मातेच्या चरणी मागण्यासाठी श्री दुर्गा माता दौड नवरात्री दरम्यान घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत दररोज पहाटे ६ / ३० वाजता श्री दुर्गा माता दौड काढण्यात आली .
यात धारकरी बंधू-भगिनी तसेच समाजातील इतर नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले .
गेल्या नऊ दिवसांपासून शहरासह परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे आयोजित श्री दुर्गामाता दौडची आज मंगळवारी अखेरच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे अपूर्व उत्साहात यशस्वी सांगता झाली. तरुणांना एकवटून त्यांच्यामध्ये देव, देश व धर्म यांचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या श्री दुर्गामाता दौडमध्ये आज देखील शेकडो युवक – युवती व शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या आजच्या शेवटच्या
दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडला शहरातील श्री.शिवस्फुर्ती मैदान येथुन प्रारंभ झाला. संध्याकाळी दुर्गा मातेची,शिवरायांची आरती व शस्त्र पूजन करून ध्वज चढवून प्रेरणा मंत्र म्हणण्याद्वारे शिवरायांच्या जयजयकारात श्री दुर्गामाता दौड सुरू झाली. दौडच्या अग्रभागी भगवा ध्वज हाती घेतलेला होता आणि त्याच्या मागोमाग शस्त्रपथक, महापुरुषांचे फोटो, भगवे फेटेधारी आणि शेकडो शिवभक्त होते. पांढरी वस्त्रे, डोक्यावर पांढरी टोपी, भगवे फेटे परिधान करून दौडमध्ये सहभागी झालेले धारकरी, युवक युवती आणि शिवभक्तांसह अग्रभागी असलेला भगवाध्वज साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
दौडच्या मार्गावर रांगोळ्या रेखाटून तसेच फुलं, पुष्पदलांची उधळण करून दौडचे स्वागत केले जात होते. त्याचप्रमाणे सुहासिनी महिला अग्रभागी असलेल्या ध्वजाचे औक्षण करून दौडचे स्वागत करत होत्या. प्रत्येक मार्गावर उस्फूर्त स्वागत होते असल्यामुळे दौडमध्ये सहभागी झालेल्या शिवप्रेमींचा उत्साह द्विगुणीत होत होता. आजच्या दौंडमध्ये अबालवृद्धांसह तरुणांबरोबरच युवतींचा सहभाग देखील लक्षणीय होता.
श्री. शिवस्फुर्ती मैदान येथुन सुरू झालेली आजच्या शेवटच्या दिवशीची श्री दुर्गामाता महादौड, विठ्ठल मंदीर, कलंत्री गल्ली, श्री, राममंदीर,शनीचौक, हुतात्मा चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांतीसुर्य फुले चौक,दत्त मंदिर, कालिका मंदिर, पाटील गल्ली, मार्गे ग्रामदैवत श्री
एकविरा माता मंदिर येथे समाप्त झाली. या ठिकाणी ध्वज उतरवण्यात आला श्री दुर्गामाता दौडचा समारोप करण्यात आला. यावेळी
श्रीशिवप्रतिष्ठानतर्फे येत्या जानेवारीत (२०२४) श्री वढु बु.ते श्री.रायगड अशी गडकोट मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेची घोषणा करण्यात आली. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री.परशराम हरळे यांचे कडून करण्यात आले.


