loader image

विजयदशमी निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडुन शस्त्र पुजन संपन्न

Oct 29, 2023


योगेश म्हस्के

मनमाड : विजयादशमी म्हणजेच दसरा निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मनमाड येथील श्री सप्तशृंगी देवी मंदिर येथे शस्त्रपुजन करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख उत्सवांपैकी एक असणारा विजयादशमी उत्सव दरवर्षी संघ स्वयंसेवकांकडुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो, 1925 मध्ये विजयादशमीच्या मुहुर्तावर संघाची स्थापना झाली होती. आज संघाचा 98 वा स्थापना दिवस असुन संघ आपल्या शतक महोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल करत आहे.

आज मनमाड शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडुन शस्त्रपुजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा.श्री नितिन लालसरे आणि प्रमुख वक्ते म्हणुन नाशिक विभाग कार्यकारणी सदस्य श्री कृष्णाजी घरोटे , मालेगाव जिल्हा कार्यवाह सुनिल चव्हाण हे उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा.नितीन लालसरे यांनी संघ शाखा बघत बघत आम्ही मोठे झालो आज सर्वत्र हिंदू समाजाचे मोठ्या प्रमाणात होणारे शक्ती प्रदर्शन बघतांना निश्चितच खुप आनंद होत आहे , हे काम किती महत्वाचे आहे हे मी सांगण्याची गरज नाही उलट मला येथे येऊन खुप अभिमान वाटला असे मत व्यक्त करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

आजचे प्रमुख वक्ते श्रीकृष्णाजी घरोटे यांनी हिंदू समाज आपली तपश्चर्या करण्यात कमी पडतो म्हणून मागे रहातो मंत्र,प्रार्थना ही सामूहिक असली पाहिजे तरच त्याचे अपेक्षित फळ मिळते व त्यासाठीच ९८ वर्षांपूर्वी रा स्व संघाची स्थापना डॉ हेडगेवार यांनी केली आणि दैनंदिन शाखेच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेची सवय समाजाला लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी जे केले तेच त्यांच्या नंतरच्या सरसंघचालक झालेल्या सर्वांनी सातत्याने केल्याने अखंड,समरस समाज निर्मितीचा प्रयत्न आज सफल झालेला दिसतो परंतु तरीही तरुणांची संघटना म्हणून ओळखले जाणारे आपले काम पुढच्या पिढीसमोर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी त्याच गतीने शाखा रुपी संघटन करत राहिले पाहिजे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि स्वयंसेवकांकडून शस्त्रपुजन करून आययुडीपी येथील सप्तशृंगी देवी मंदिरापासून शहरातील भवानी चौक , आठवडे बाजार , वेशीतील निलमणी गणपती मंदिर , मनमाड नगरपालिका ,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा , छत्रपती शिवाजी महाराज चौक , महात्मा फुले चौक मार्गे सघोष संचलन काढण्यात आले , यावेळी शहरातील संघाचे जेष्ठ कार्यकर्ते , शहर भाजपाचे पदाधिकारी आणि मनमाड , पाणेवाडी , धोटाने , नागापूर , खादगाव ,अस्तगाव , भालूर , एकवई , लक्ष्मीनगर ,अंकाई तांडा , अनकवाडे , तांदुळवाडी येथील स्वयंसेवक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.