आ. सुहास कांदे यांचा उपक्रम
नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कीर्तनकार महाराज यांचे चरण कमल पूजन व भजनी मंडळ यांना भजन साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.
आ.सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रत्येक भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप करण्याचा सुंदर असा कार्यक्रम आज नांदगाव येथे गुप्ता लॉन्स च्या प्रांगणात अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या निमित्ताने नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व कीर्तनकार महाराजांना आमंत्रित करून त्यांचे चरण कमल पूजा करण्यात आली भारतातील चार धाम येथून पवित्र नद्यांचे जल आणून हे पूजन करण्यात आले.
यानंतर सर्व कीर्तनकार महाराजांना आदर्श वारकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वारकरी पूजन व भजन साहित्य वाटप कार्यक्रमाचे निमित्ताने परिसर अतिशय भक्तिमय झाला होते आ.सुहास कांदे सौ अंजुमताई कांदे यांचे हात जोडलेले कट आउट प्रत्येक ठिकाणी लावलेले होते,
मंडपाच्या प्रवेशद्वारावर विठ्ठलाची प्रतिकृती उभारण्यात आली होती तसेच वारीचे कट आउट उभारण्यात आले होते .
मतदार संघातून जवळपास १५ ते १६ हजार वारकरी व नागरिकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली.
कार्यक्रम स्थळी आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांचे भजनी मंडळाचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हात जोडून स्वागत केले.
कार्यक्रमास आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांना वारकरी टोपी व वारकरी उपरणे देऊन जय हरी म्हणत आदराने त्यांना स्थानपन्न केले जात होते.
यावेळी भव्य मंडपात सर्व वारकरी व नागरिकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज बुलढाणा यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.
पुरुषोत्तम महाराजांनी आपल्या कीर्तनात आ. सुहास कांदे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना जो धर्माची सेवा करतो तो आशीर्वादास पात्र असतो असे सांगत अण्णांनी मतदारसंघातील वारकरी संप्रदायाची सर्व धर्मांच्या संत महंतांची मानसन्मान करत जो आदर भाव दाखवला याबद्दल वारकरी समाज सदैव अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी आ.सुहास कांदे सौ. अंजूम ताई कांदे तसेच शिवसेना पदाधिकारी खाली जमिनीवर बसले होते तर स्टेजवर फक्त कीर्तनकार महाराज भजनी मंडळी वादक व गायक मंडळी बसलेली होती.
किर्तन सेवा संपल्यानंतर काही प्रमुख संत महतांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना अण्णांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा महाराष्ट्रातील पहिलाच असा उपक्रम आहे ज्यात आपलं एक वेगळेपण आहे असे म्हटले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी आपल्या भाषणात आ.सुहास कांदे यांनी केलेल्या विकास कामांच्या लेखाजोखा मांडला तसेच विकास कामांसोबतच अण्णा सामाजिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वच आमदारांच्या मानाने आघाडीवर असल्याचे सांगितले.
आ.सुहास कांदे यांनी आपल्या मनोगतात आज घेत असलेल्या कार्यक्रमाच्या पाठीमागे कोणत्याही राजकीय उद्देश नसल्याचे स्पष्ट केले अनेक गावांमध्ये फिरत असताना तरुण पिढी व्यसनांच्या मागे लागली असून मग ते कोणतेही व्यसन असो त्यांना सरळ मार्गावर आणण्यासाठी प्रत्येक गावात जिम तसेच देव धर्माकडे आकर्षित करण्यासाठी भजनी मंडळांना साहित्य द्यावी ही कल्पना आली आणि अशातच काही भजनी मंडळांनी त्याची मागणी केली होती तेव्हाच मागणी केलेल्या मंडळांना नाही तर संपूर्ण मतदारसंघातील गावात जितके मंडळे असतील त्या प्रत्येक मंडळांना साहित्य द्यावे असा विचार पक्का केला आणि आज तो कार्यक्रम संपन्न होत असल्याचा मलाही आनंद होत आहे असे म्हटले.
या कार्यक्रमात मतदार संघातील १४८ गावातून २०० भजनी मंडळांना यावेळी भजन साहित्य भेट देण्यात आले यामध्ये १० टाळ मृदुंग व विना याचा सहभाग आहे.
या कार्यक्रम प्रसंगी सर्व कीर्तनकार महाराज आलेला साधू महंत, वारकरी मंडळी, भजनी मंडळी आलेल्या नागरिकांना पंचपकपन्न जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
या प्रसंगी वैराग्यमूर्ती ह. भ. प तुकाराम महाराज जेऊरकर ‘ जयराम बाबा गोंडेगावकर ‘ श्रावण महाराज अहिरे ‘माधवगिरी महाराज ‘नामदेव महाराज बोगीर ‘रामकृष्ण महाराज बानगावकर ‘ दत्तात्रय महाराज ‘बाळकृष्ण महाराज ‘ गुरुकुल सोमेश्वर आनंद महाराज जोंधळवाडीकर सर्व आखाड्यांचे महंत संत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार गायनाचार्य व मृदंगाचार्य तसेच तसेच मतदार संघातील सर्व गावागावातील भजनी मंडळी व नागरिक तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी युवासेना महिला आघाडी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदकिशोर महाराज दौंड यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
