आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, या उक्ती प्रमाणे दरवर्षी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिवाळी आनंदाची कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही डोणगाव रोड येथील आश्रम शाळेत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी दीपक गोगड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन भविष्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले व सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव सौ.वैशाली पगारे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष सौ.अपर्णाताई देशमुख, राष्ट्रवादीचे पदाधिकारी योगेश जाधव, अक्षय देशमुख, अमोल गांगुर्डे, फिरोज शाह, युवती अध्यक्ष कोमल निकाळे, हर्षदा तावडे, स्थानिक संचालक श्री.वाल्मिक कदम, माधवभाऊ शेलार, आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे नंदकिशोर पगार, नामदेव शेवाळे, अशोक सुलाणे, वसंत कामडी, श्रीमती चंद्रकला सोनवणे, अलका भवर, अधीक्षक दत्तात्रय पवार, चिंतामण पगारे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे श्रीराज कातकाडे व आनंद बोथरा यांनी केले होते.

राशीभविष्य : १५ ऑक्टोबर २०२५ – बुधवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....