loader image

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

Nov 4, 2023


मनमाड – नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून तालुक्यातील नागरिक, माताभगिनी, शेतकरी, शेतीवर काम करणारे हातमजुर, व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत. सर्वत्र शेतजमीनी ओसाड पडल्या आहेत, विहिरु व बोअरींगने तळ गाठला आहे त्यामुळे फक्त शेतीच नव्हे तर जनावरांना देखील पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना बाहेरगावहून मोठ्या प्रमाणात चारा विकत आणावा लागत आहे. नांदगाव तालुक्यातील माता भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नांदगाव तालुक्यातील सद्य परिस्थिती गंभीर असतानाही व तालुक्याबाबत दखल घेतली जात नाही, विविध स्तरावर आंदोलने करण्यात आली तरीही शासन नांदगाव तालुक्याकडे लक्ष देण्यास तयार नाही तसच आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव व धनगर बांधव, भगिनी, वयोवृध्द तसेच परिवारासह आरक्षणसाठी व मुलभूत हक्कासाठी शासन दरबारी अगदी संयमाने मागणे मागत आहे. आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या, राज्यात सर्वत्र साखळी उपोषणे चालू असून अन्नत्याग, मुंडन अशी आंदोलने होत आहेत. आरक्षण प्रश्र्नी त्वरित दखल घेवून न्यायद द्यावा अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प क्षाच्या वतीने शासनास करण्यात आली आहे. राज्यातील सदर गंभीर परिस्थितीबाबत शासनाला जाग आणण्यासाठी नांदगाव तालुक्यातील सर्वच , शेतकरीबांधव, माताभगिनी यांच्या वतीने शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकरी यांनी आज नांदगाव येथे मोर्चा काढून सदर मागणी केली आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या उपस्थितीत आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.