loader image

रोटरी क्लब ऑफ मनमाड ची वार्षिक प्रांतपाल बैठक ( ओ सी व्ही ) संपन्न

Nov 4, 2023


मनमाड – रोटरी वर्षाप्रमाणे दरवर्षी होणारी प्रांतपाल बैठक रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या पहिल्या महिला प्रांतपाल म्हणून मान मिळालेल्या अशाजी वेणुगोपाल आणि असिस्टंट प्रांतपाल श्री. डॉ. अरूनजी पठाडे ह्यांच्या प्रमुख उपस्थित ह्या ही वर्षी मोठ्या उत्साहात मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालय येथे संपन्न झाली . ह्या मध्ये प्रामुख्याने प्रांतपाल व उप प्रांतपाल यांनी क्लब चा वार्षिक कामाचा अहवाल तपासून क्लब ला पुढील कामासाठी अजून कशी गती देता येईल तसेच रोटरी चे सामाजिक कार्य आणि रोटरी ने आज पर्यंत केलेल्या कामाची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचवता येईल ह्या वर प्रांतपाल अशाजी वेणुगोपाल यांनी सुंदर आणि विस्तृत मार्गदर्शन केले .
जगभरात पोलिओ मोहीम यशस्वी पणे राबविण्यासाठी जगभरातल्या सर्व रोटरी सदस्यांनी मोलाचे योगदान दिले आहे असे ही त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले . ह्या बैठकीचे औचित्य साधून ह्या वर्षी क्लब मध्ये नवीन सदस्य म्हणून मनमाड येथील शिवम कॉम्प्युटर्स चे संचालक श्री. प्रकाश भुजबळ सर व गणेश ग्रॅनाईट गॅलरी चे संचालक श्री. विनोद यादव यांना प्रांतपाल आशाजी वेणुगोपाल ह्यांच्या हस्ते रोटरी पिन देऊन सदस्य करण्यात आले आणि प्रांतपाल आशाजी यांनी रोटरी क्लब मनमाड च्या सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले .
ह्या बैठकी प्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष श्री. स्वप्नील सूर्यवंशी तसेच सेक्रेटरी श्री. डॉ. रवींद्र सुर्वे तसेच खजिनदार श्री. अनिलदादा
काकडे , ज्येष्ठ सदस्य श्री. सुभाष गुजराथी सर , पोपटजी बेदमुथा गुरुजीत सिंह कांत , राजेंद्र गुप्ता देवराम सदगिर , लवकुमार माने , डॉ. धीरज बरदिया, पोपट बोरसे , आनंद लोढा , कौशल शर्मा , आनंद काकडे , तसेच रोटरी महिला क्लब सदस्य सौ. रवींद्र कौर कांत , चित्र गुजराथी , सौ. सुलभा काकडे , सौ. पूर्णिमा माने ,सौ. लीला सदगिर सौ. लोढा सौ. सेनोरीता सूर्यवंशी , सौ. सुर्वे मॅडम , सौ. मयुरी काकडे, सौ. खुशी शर्मा , सौ. निधी शर्मा , सौ. बरडिया सौ. यादव , सौ. भुजबळ सौ. पवार ,सौ. बोरसे तसेच इंनरव्हील क्लब च्या अध्यक्षा सौ. सुमित्रा ललवाणी आणि त्यांचे सहकारी आदी सर्व उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व क्लब सदस्य यांनी मेहेनत घेतली .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन गुरुजीत सिंह कांत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुर्वे यांनी केले .


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.