loader image
[ays_poll id=7]

पोषण आहार कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी मोर्चा

Nov 7, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी आधारवड महिला बाहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
संस्थेच्या वतीने पंचायत समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले असून यामध्ये म्हटले आहे की, की आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार कर्मचारी म्हणून काम करतो आहे. आम्हाला अगदी तुटपुंज्या स्वरूपात मानधन दिले जात असून ते देखील वेळेवर मिळत नाही. आम्हाला मिळणाऱ्या मानधनाच्या मोबदल्यात आम्ही शालेय पोषण आहार व्यतिरिक्त शाळेतील इतर कामे करतो मात्र त्याबद्दल आम्ही कधीच काही तक्रार केलेली नाही मात्र आमच्या सारख्या ग्रामीण भागातील महिलांना कामाच्या मोबदल्यात मिळणारे मानधन अगदी तोकडे आहे त्यामुळे आम्हाला राज्य सरकारने मानधन वाढवून द्यावे यासह राज्य सरकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कर्मचाऱ्यांना किमान २० हजार वेतन देण्यात यावे. चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी. सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी. थकीत इंधन बिल व मानधन दर महिन्याला देण्यात यावा. कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये. त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये.दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे. तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे.12 महिन्याचे मानधन देण्यात यावे किमान वेतन मिळेपर्यंत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासना नुसार दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी तसेच दिवाळी बोनस लागू करण्यात यावे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण कवच द्यावे तसेच अपघाती विमा संरक्षण द्यावे. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी संगीता सोनवणे, वैशाली वाघ, विमल वाघ, संगीता निकम, शैला पवार, सुनिता राठोड, लंका पवार, वनिता डोंगरे,पुंजाबाई पवार यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.