loader image

तब्बल २८ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

Nov 8, 2023


गोरक्षनाथ लाड (प्रतिनिधी)

दरेगाव- चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे श्री.संत ज्ञानेश्वर विद्यालयात सन -१९९५ दहावी चे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन व विद्यालय आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता कार्यक्रम सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण करून वेगवेगळे रस्ते निवडलेले जवळपास ७० माजीवर्ग मित्र तब्बल २८ वर्षांनंतर एकत्र आले.मे‌ळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. ‘प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता.मुंबई,पुणे,छत्रपती संभाजी नगर,नाशिक,ठाणे, आदीसह ठिक ठिकाणीहून आलेले वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपणांस ज्ञानदान केलेल्या सर्व गुरुजनांना कार्यक्रमास निमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली..
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संत ज्ञानेश्वर विद्यालय तळेगाव रोही संस्थापक ह.भ.प. श्री. राधाजी पाटील लाभले
तसेच आपण शाळेचे काही देणे लागतो या कृतज्ञ भावनेतून शाळेला एक ग्रीन बोर्ड यावेळी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापिका सौ.साधनां संसारे यांचेकडे सुपुर्द करण्यात आला.सन १९९५ बॅच च्या वतीने सर्व शाळेला स्नेह भोजन देण्यात आले.
सदर प्रसंगी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात घालवलेल्या रम्य आठवणींना उजाळा दिला व गुरुजनांनीही विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुकाची थाप दिली.
या प्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक अण्णासाहेब पवार,एस. टी. पवार,ए. के. बोराडे,भीमाशंकर गायकवाड,शिवदास बडगुजर,अण्णासाहेब आवारे,चंद्रभान मढे,बी .व्ही. पानसरे,अशोक शेळके,बी .पी. पाटील,श्रीहरी पाटील,शिवाजी पाटील,भाऊसाहेब वाकचौरे,शिवाजी देवढे हे सर्व शिक्षक व सन १९९५च्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते..

तसेच माजी विद्यार्थी डॉ. सोमीनाथ आरोटे सर यांची (भुगोल विषयात पीएचडी झाली आहे) सर कला विज्ञान महाविद्यालय लासलगाव उपप्राचार्य यांनी स्पर्धा परीक्षा विषयी शाळेतील मुलांना मार्गदर्शन केले, माजी विद्यार्थी ह. भ.प सचिन महाराज मैत्री या विषयावर मार्गदर्शन केले माजी विद्यार्थी संतोष कोकणे, नवनाथ जिरे, बजरंग जाधव, संतोष हिरे, मधुकर वाघचौरे विक्रम वाघचौरे, संतोष वाघचौरे, साहेबराव वाघचौरे, प्रमोद चव्हाण,अशोक मेंगाने, अशोक चव्हाण, अरुण वाघचौरे, शरद चव्हाण, सखाहारी राजनोर, नंदू ठाकरे, गंगाधर पिंपरकर,समाधान रवि साळे, दिलिप झाल्टे, रामदास कदम, देवचंद आरोटे,प्रभाकर केदारे, ऊत्तम जोधळे, समाधान पाटोळे, भिका पाटोळे, सुखदेव वाकचौरे,कैलास सोनवणे, विश्वास कोल्हे, पोपट मोरे, भाऊराव मोरे, भाऊसाहेब मोरे, प्रकाश संसारे, वैभव संसारे हिरामण आहिरे, जयश्रीताई कोल्हे , अलकाताई उबाळे, मीनाताई अहिरे, मंदाताई शिंदे, सविताताई, सोनालीताई मोरे, रंजनाताई ससारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व माजी शिक्षक व माजी विद्यार्थी या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.