नांदगांव : (मारुतीजगधने) राष्ट्रवादी काँग्रेसचे ता. प्रमुख महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखाली नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर करावा या मागणी साठी सलग सहा दिवस अमरण उपोषन करण्यात आले या संदर्भात अधिकार्यासी प्रत्यक्ष चर्चा करुन उपोषन मागे घेण्यात आले आहे परंतु दिलेल्या आश्वासने व झालेली चर्चा समाधान करक नसल्याचे मत महेंद्र बोरसे व उपोषणार्थींनी म्हटले तुर्त उपोषन मागे घेण्यात आले आहे .पण या दरम्यान नंतर काही विषेश सुचना उपोषनार्थीनि संबधित अधिकार्याना केल्या.
तालुका प्रशासकीय यंत्रणेने दिं.६/११/२०२३ प्रत्यक्ष चर्चा करून उपोषण कर्त्यांनी केलेल्या ११ प्रमुख मागण्यातील अनेक मुद्यांवर केलेला खुलासा आणि आणि अहवालानुसार खालील बाबी ह्या असमाधानकारक असल्याचे निदर्शनास येते.
पीकविमा दावे संदर्भात सर्व पूर्तता कृषि विभागाने केली असून पात्र/अपात्र दावे अहवाल प्रलंबित नसल्याचे पत्र सादर केले आहे, सादर पत्रांची सत्यता गृहित धरून तालुक्यांतील एकही शेतकरी पिक विमा योजनेच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही अशी अपेक्षा.
भविष्यात काही त्रुटी निदर्शनास येऊन सर्वसामान्य शेतकरी पिक विमा पासून वंचीत राहिल्यास त्याचे उत्तरदायित्व कृषि विभाग व संबंधीत यंत्रणेचे असेल.
नाग्या- साक्या धरणातून होणारा पाणी पुरवठा हा शुद्धीकरणाच्या प्रक्रिया पार पाडून केला जातो असा निर्वाळा पंचायत समिती प्रशासनाने पत्राद्वारे केला असून ह्या बाबत उपोषण कर्त्यांचे समाधान होत नसल्याने तहसिलदार यांनी ह्या प्रश्नात विशेष लक्ष घालून फेर नियोजन करावे, पंचायत समिती प्रशासनाने नियोजनाच्या दुसऱ्या टप्प्याचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करावी.
बैठकीत उपस्थित पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा विभाग राज्य शासनातर्फे प्राप्त तुटपुंज्या मदतीनुसर कसेबसे नियोजन करत आहे. सदर बाब हि कुठल्याही परिस्थितीत अतिशय गंभीर असून शासनाने किमान प्रतिकूल परिस्थितीत ह्या बाबीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळें संबंधित यंत्रणेने अत्यंत काटेकोर नियोजन करून दुष्काळाला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आपली मागणी वेळोवेळी वरीष्ठ पातळीवर नोंदविणे अपेक्षित असते. भविष्यकालीन तरतूद लक्षात घेऊन चारा, चारा पिके, पाणी, वैद्यकीय सुविधा ह्या बाबत कृती आराखडा तत्परतेने बनवून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा.
तालुका प्रशासकीय अधिकारी व लघू पाटबंधारे विभाग यांनी उपलब्ध जलसाठे व जलव्यवस्थापन ह्या बाबतीत योग्य वेळी अतिशय अचूक नियोजन करून भविष्यातील पाणी टंचाई कृती आराखडा राबविणे गरजेचे आहे, ह्यात पिण्याचे पाणी, चारापिके ह्या संदर्भात शेतकरी व जनतेला दिलासा देणे कामी सुश्मनियोजन अपेक्षित.
प्रशासनाने सादर केलेल्या ग्राम पिक पैसेवारी समितीबद्दल अनेक आक्षेप असून ही वेळ वादविवाद घालण्याची नसून सादर अहवालानुसार वरिष्ठ पातळीवर सकारात्मक पाठपुरावा करावा ह्या भूमिकेतून आज कुठलाही आरोप प्रत्यारोप टाळून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे ठरले आहे. झालेल्या हलगर्जीपणाचा जबाबदारी हि प्रशासनाची असेल.तालुक्याचे हित जपले जावे ही सद्यस्थितीत आमची भूमिका असून ह्या बाबत प्रशासनाचे अजूनही अचूक पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य त्या उपययोजना करणे गरजेचे आहे.
कृषि विभागाने सादर केलेला पिक प्रयोग GEO TAGGING अहवाल त्रोटक व अपूर्ण असून तो उपोषण कर्त्यांना मान्य नाही, त्याच प्रमाणे मुरघास योजने अंतर्गत तालुक्यातून एकही मागणी अर्ज प्राप्त नसल्याची माहिती कृषि विभागाने लेखी उत्तरात कळविली आहे. तालुक्यातील काही शेतकरी बांधवांनी मुरघास प्रयोग आपल्या जागेत राबविला आहे, मग तो एकतर स्वखर्चातून राबविला असेल किंवा कृषि विभागाच्या माध्यमातील योजनेचा भाग असेल. तर ह्या संदर्भात वस्तुस्थितीदर्शक खुलासा मा.जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयाकडे मागवून तालुका यंत्रणा दोषी आढळल्यास पुढील नियमाधिन कार्यवाही साठी पाठपुरावा केला जाईल.
कृषि विभाग हा प्रत्येक प्रश्नावर अत्यंत अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती लेखी स्वरूपात सादर करून जबाबदारी झटकत असल्याचे व एका अर्थाने शेतकऱ्यांनी मागणी न केल्यामुळे नियोजन न केल्याचे भासवत आहे, ही बाब अतिशय गंभीर असून ह्या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून संबंधितावर योग्य कारवाई साठी पाठपुरावा करण्यात येईल.
उपोषण कर्त्याच्या ११ मागण्यांवर प्रशासन समाधानकारक खुलासा देऊ शकले नाही. बऱ्याचश्या बाबींची पूर्तता हि ऐनवेळी जमवाजमव करून केली असावी, अशी शंका घेण्यास वाव असून योग्यवेळी याबद्दलची जबाबदारी निश्चित होईलच.
तूर्तास तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य पाठपुरावा करावा मराठा आरक्षणासंदर्भात तालुकास्तरीय समिति दफ्तरी असलेल्या कुणबी नोंदी तपासत आहे, त्यामुळें त्यांना अपेक्षित वेळ मिळावा आणि तोंडावर आलेला दिवाळीचा सण ह्या भूमिकेतून उपोषण तातपुरते स्थगित करण्यात आले आहे.
गट विकास अधिकारी
पं. स. कार्यालय नांदगांव
तालुका कृषि अधिकारी
कृषि विभाग,नांदगाव अधिकारी उपास्थीत होते.
या प्रंसंगी उपोषनात महेंद्र बोरसे,निलेश चव्हाण,आन्ना काकळीज दिनकर पाटील,सखाराम यमगर,मच्छीद्र वाघ,निवृत्ी खालकर,देवा बोरसे,प्रशांत बोरसे, दिगंबर पवार,कुणाला बोरसे, प्रशांत बोरसे,मगेश बोरसे, मिलिंद पवार,ग्यानेश्वर निकम,किरण बोरसे आदींनी उपोषनात सहभाग नोंदविला होता
महसूल विभागाने
वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करणे,कुणबी नोंदी तपासणी ची नांदगांव तहसिला शोधणे ,आणी दिवाळी सनाच्या उंबरठ्यावर तुर्त राष्ट्रवादीचे उपोषन मागे घेण्यात आले.

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...