नांदगाव : (मारुती जगधने)नांदगांव येथील राष्ट्रवादी(एस पी) गटाचे उपोषन मागे घेण्यात आले त्याच दिवसी दि ७ पासून राष्ट्रवादीच्या( एपी) गटाचे उपोषन सुरु होऊन दोन दिवस झाले उपोषन सुरु आहे .
असे विरोधीगट व सत्ताधारी गट या दोन्ही गटांनी उपोषन केले आता राष्ट्रवादीच्याच
सत्ताधारी गटाने नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर होण्यासाठी उपोषन सुरु केले.
नांदगाव तालुक्यात यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रचंड दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी नांदगाव येथील नविन तहसील कार्यालया जवळ राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी अजित पवार गटाचे बेमुदत उपोषण आज सुरू करण्यात आले.या वेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.नांदगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस होऊनही प्रशासनाच्या निष्काळजीपणाने शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालूक्यात समावेश न करण्यात आल्याने उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. शासनाने त्वरीत नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. गुरांसाठी चारा छावण्या, मागिल वर्षी झालेल्या अतिवृष्टी व गारपीटीचे अनुदान जाहीर करावे अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले आहे.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे नांदगाव तालुकाध्यक्ष विजय चव्हाण पाटील, विनोद शेलार, अमित बोरसे,सोपान पवार, राजेंद्र लाठे, दत्तू पवार, देवदत्त सोनवणे,अतुल पाटील,घनश्याम सुरसे, अशोक पाटील, जगदीश सुरसे, विश्वनाथ बोरसे, शंकर शिंदे, शुभम बोरसे, सुशील आंबेकर, उमाकांत थेटे, रामसिंग पिंगळे,दत्तात्रय निकम, विजय आहेर, खंडू थेटे, प्रवीण मोहिते, वाल्मिक टिळेकर,चंद्रकला बोरसे,सुगंधा खैरनार, यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...