नांदगांव : मारुती जगधने
तालुक्यातील चिंचविहीर तांडा येथील १५ वर्षे वयाच्या
दोन मुली सिमेंट बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या असता अचानक तोल जाऊन किंवा पाय घसरुन पाण्यात पडल्याने दोघींचा बुडून मृत्यु झाला तर त्यांना वाचविण्यास गेलेली कावेरी देविदास भालेकर वय १७ ही पाण्यात बुडल्याने अस्वस्थ झाल्याने तिला मालेगांव येथे उपचारास दाखल केले आहे .
दरम्यान चिंचविहीर येथे तिन मुली सिमेंट बंधार्यावर दि ८ रोजी कपडे धुण्यास गेल्या तेव्हा दुपारी ३ वा ही घटना घडली या दरम्यान
पूजा अशोक जाधव व खुशी देविदास भालेकर दोघी इयत्ता ९ वि च्या वर्गात शिकणार्या मुली व या पैकी एकीचा तोल गेला किंवा पाय घसरला असाव एक दुसर्याला वाचवताना खोल पाण्यात बुडल्या त्यात त्यांचे निधन झाले
त्याना वाचविणारी कावेरी देखील पाण्यात बुडाली होती तिला वाचविण्यात स्थानिक नागरीकाना यश आले असून कावेरीस उपचार देण्यास बाहेर गावी हालवि्यात आले आहे या घटनेची पो नि प्रमित चौधरी व PSI वाघमारे यांनी घटनास्थळाला भेद दिली .
या दु:खद घटनेने चिंचविहीर गावावर शोककळा पसरली आहे .
