त्रिचूर केरळ येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स लीग मध्ये जय भवानी व्यायामशाळेच्या पूजा राजेश परदेशी हिने ५९ किलो वजनी गटात सीनियर मध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत स्नॅच मध्ये ८१ किलो क्लीन जर्क मध्ये १००किलो वजन एकूण १८१किलो वजन उचलून प्रभावी कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले
छत्रे विद्यालयाच्या १३ वर्षाच्या आनंदी विनोद सांगळे हिने आपल्या पहिल्याच स्पर्धेत ७६ किलो वजनी गटात सहभागी होत स्नॅच मध्ये ६७ किलो व क्लीन जर्क मध्ये ७५ किलो क्लीन जर्क असे १४२ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले
वैष्णवी वाल्मीक ईप्पर हीने ६४ किलो ज्युनियर्स मध्ये ७० किलो स्नॅच व ९४ किलो क्लीन जर्क १६४ किलो वजन उचलून चवथा क्रमांक व वैष्णवी जनार्धन उगले हिने ७४ किलो स्नॅच व ८८ किलो क्लीन जर्क असे १६२ किलो वजन उचलून पाचवा क्रमांक करुणा रमेश गाढे हिने ७१किलो सीनियर्स मध्ये सहावा क्रमांक मिळविला विजेत्या खेळाडूना रोख बक्षिसे देवून गौरविण्यात आले
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्र विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील प्राचार्य डॉ दत्ता शिंपी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

