नांदगांव : मारुती जगधने
आमदार सुहास कांदे नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर होण्यासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
आज मुंबई येथे मदत व पुनर्वसन विभागाची दुष्काळ परिस्थितीवर बैठक संपन्न झाली याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित राहून महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांना नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली व निवेदन दिले
मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील साहेब यांनी नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करण्याबाबत सकारात्मकता दाखवली. संबंधित अधिकाऱ्यांना समावेश करण्याबाबत निर्देश दिले.
मनमाड शहरात २६१ रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान
मनमाड शहरात आज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले...











