आ. सुहास आण्णा कांदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मनमाड शहरातील तीन ख्रिश्चन धार्मिक स्थळांच्या सुशोभीकरण कामासाठी प्रत्येकी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला.त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले.
मनमाड शहरातील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च,संत बार्णबा चर्च,बेथेल चर्च, यांचे प्रमुख धर्म गुरु फादर रेवरेंट सहायराज फर्नांडो, रेवरेंट फिलीप वरा, रुपेश निकाळजे उपाध्यक्ष नाशिक धर्म प्रांत, रेव्हेंट दीपक साबळे यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक स्थळांमध्ये भूमिपूजन सोहळा पार पडला. या प्रसंगी संत बार्णबा चर्चा च्या सदस्य असलेल्या कुमारी वर्ष वोहोळ या दिव्यांग मुलीला व्हीलचेयर भेट देऊन सामाजिक कर्तव्य ही पार पाडले तसेच तिच्या पुढील उपचारासाठी मदत करण्याच्या आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील आप्पा आंधळे, निलेश सपकाळे, लाला नागरे, दिलीप सूर्यवंशी, मुकुंद झाल्टे, लोकेश साबळे, पिंटू वाघ, डेव्हिड जॉर्ज, प्रमोद अहिरे, सिध्दार्थ छाजेड, अजिंक्य साळी, संदीप काळे, संजय नागरे, बाबा पठाण, राकेश ताठे, जॉनी जॉर्ज, अमोल दंडगव्हाळ, महेश कापडणीस, सुशांत जाधव, प्रतीक पाथरकर, प्रतीक कदम, शुभम शिंपी प्रसिध्दी प्रमुख निलेश व्यवहारे
तसेच महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप, विधानसभा संघटक पुजाताई छाजेड, छाया पाथरकर, मुस्कान शेख, छाया कातकडे, सगीता सांगळे, आदींसह ख्रिश्चन बांधव, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.






