नांदगाव: मारुती जगधने नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्व थरातुन प्रयत्न झाले आता तालुक्यातील पाच मंडळाना दुष्काळ जाहीर झाला याचे श्रेय नेमके कोणाला ?सर्वांनीच प्रसिद्धी देऊन श्रेय घेतले .
प्रयत्न करणार्या पैकी नांदगांव छगन भुजबळ,आमदार सुहास कांदे, प्रथम उपोषनाला बसनारे महेंद्र बोरसे गट,दुसर्यांदा उपोषन करणारे विजय चव्हाण गट (राष्ट्रवादीचे दोन्ही गट) यांनी दुष्काळ जाहीर होण्यासाठी प्रयत्न केला. एकदाचा तालुक्यातील काही भागात दुष्काळ जाहीर झाला आणी सर्वांचा जीव भांड्यात पडला. तसे श्रेय कोणीही घेवो पण नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर झाला पुढे काय या बाबत सध्यातरी संभ्रम ?
नांदगाव तालुक्यातील एकूण आठ मंडळांपैकी पाच मंडळे दुष्काळी जाहीर करण्यात आले त्यात मनमाड, नांदगाव, जातेगाव, वेहळगाव व हिसवळ ही मंडळे दुष्काळी घोषित करण्यात आली. उर्वरित तीन मंडळे बाणगाव, न्यायडोंगरी व भार्डी या मंडळात पर्जन्यवृष्टी मापक नसल्याकारणाने ही मंडळे अद्यापही दुष्काळी घोषित होणे बाकी आहेत परंतु लवकरात लवकर ही तिनही मंडळे दुष्काळी जाहीर होतील. असे दूरध्वनी द्वारे ना. छगनरावजी भुजबळ यांनी सर्व उपोषण कर्ते विजय चव्हाण आदी कार्यकर्त्यांना सांगितल्याचे राष्ट्रवादी एका गटाकडुन सांगण्यात आले.
दरम्यान मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीट झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मिळावे तसेच वाड्या वस्त्या व गावासाठी पिण्यायोग्य पाणीपुरवठा करणे, जनावरांसाठी चारा व पाणी उपलब्ध करून चारा छावणी सुरू करणे, शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करणे, तसेच २०२३-२४ च्या शेतीसाठी झालेल्या खर्चाचे नुकसान भरपाई मिळणे इत्यादी मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले व यासाठी नांदगाव तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी येत्या चार ते पाच दिवसात बैठक घेऊन सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन याप्रसंगी ना. अजीत पवार गटाला दिले या प्रसंगी राष्ट्रवादी चे ना अजीत पवार गटाने उपोषन मागे घेतले .
नांदगांव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यास शासकिय यंञणेवर ठपका ठेवण्यात आला. या दरम्यान ना. भुजबळ,आ कांदे, व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे उपोषन या सर्वांना याचे श्रेय म्हणावे का?