नांदगाव : (मारुती जगधने) नांदगाव मनमाड नॅशनल हायवेवर दि ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वा एका भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या गर्भवती हरणाला जबर ठोस मारल्याने हरीण ठार झाले. सध्या वन्यप्राणी हिरवा चारा व पाण्याच्या शोधात भटकंती करीत असतात .
नांदगांव मनमाड नॅशनल हायवेवर मनमाड हुन नांदगाव दिशेने जाणार्या वाहनानाने नांदगाव पासून ३ किमी वर भारती सदन नजिक हायवे रस्ता पास करणार्या सात वर्षाच्या गर्भवती हरणाला जबर ठोस मारल्याने गंभीर जखमी होऊन ठार झाले. यावेळी अनोळखी वाहन धारकाने रोडवर पडलेले हरीण ओढत नेऊन रस्त्याच्या बाजूला फेकले व तेथून वाहन चालक पसार झाला.
यावेळी मोकाट कुञ्यांनी मृत हरणावर ताव मारण्याचा प्रयत्न करत असताना माॅर्नींग वाॅकला जाणार्या नागरिकांनी हे बघितले तेव्हा या घटनेची माहिती सकाळी प्राणी मित्र ईशान शर्मा यांनी वनविभागाला कळविले वनविभागाची गाडी आली व मृत हरीण ते घेऊन गेले.
दरम्यान तालुक्यात भीषण चारा पाणी टंचाई असून वन्य प्राणी हिरवा चारा व पाण्याच्या शोधार्थ शहरी व मानवी वस्तीकडे येतात तालुक्यात वन्यप्राण्याना पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नाही त्याचे हरीण बळी ठरले आहे .मोर, हरीण ,लांडगे,कोल्हे,ससे,आदीं प्राण्याचे प्रमाण तालुक्यात अधिक आहे .
