नांदगाव – मारुती जगधने
धन्वंतरी दिनाचे औचित्य साधीत डॉक्टर असोसिएशनने गोदावरी हॉस्पिटल येथे धन्वंतरी पुजन आयोजित करण्यात आले होते .
यावेळी सविचार सभा घेण्यात आली. यात सर्व डॉक्टर सभासद उपस्थित होते प्रथमतः डॉ.शशांक तुसे, डॉ . काजल तुसे यांनी सपत्नीक धन्वंतरीचे पूजन व आरती केली .यावर्षीचा धन्वंतरी पुरस्कार डॉ. नरेंद्र सूर्यवंशी यांना देण्यात आला तो त्यांनी पूर्ण परिवारासोबत स्वीकार केला यावेळी त्यांचे वडील मधुकर सूर्यवंशी सर व डॉ.नरेंद्र सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रथेप्रमाणे यावेळी नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश चव्हाण व सेक्रेटरी म्हणून डॉ. संदीप पाटील व खजिनदार म्हणून डॉ.धर्मदाय दुकळे तसेच उपाध्यक्ष म्हणून डॉ. योगिनी गणेश चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ. अतुल नावंदर व खजिनदार उदय मेघावत यांनी त्यांचा कार्यभार नूतन कार्यकारणीचे अध्यक्ष गणेश चव्हाण व खजिनदार धर्मराज दुकळे यांच्याकडे सुपूर्त केला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विचार सभा पार पडली डॉ. वाय पी जाधव यांच्या हस्ते डॉ.सूर्यवंशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी डॉ.असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. डॉअनिल वानखेडे, डॉ. रमण गादिया, डॉ. वाय पी जाधव, डॉ. सुनील तुसे, डॉ रवींद्र वाघ, श्री व सौ डॉ. बोराडे, श्री व सौ डॉ.शितल व सचिन अत्रे, श्री व सौ नाईक, श्री व सौ मेगावत, श्री व सौ नावंदर, श्री व सौ राठोड, श्री व सौ डॉ.अमित गायकवाड,डॉ. कीर्ती आहेर,डॉ.परितोष गुप्ता व गुप्ता परिवार, डॉक्टर विवेक काकळीज व सौ काकळीज डॉ.अमित गादिया, डॉश्री व सौ सागर भिलोरे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. सचिन पगार, श्री व सौ श्रीकांत देवरे डॉ. तुषार गोराडे, डॉ. तेजस पवार,डॉ.संदीप घोडके डॉ. मनोज कोरडे, डॉ. महेश सुरसे हे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विवेक तुसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी प्रयत्न केले डॉ.हर्षद तुसे व डॉ. सौ ख्याती तुसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून आभार व्यक्त केले.