सोमनाथ घोगांणे
दिपावली पाडव्यानिमित्त शहरातील व्ही.जे हायस्कूल येथे पंडित जसराज यांचे शिष्य पंडित प्रसाद दुसाने यांच्या रागदारीवर आधारित मैफिलीत नांदगावकर मंत्रमुग्ध.
एक से बढकर एक मराठी, हिंदी, नाट्य गीतांमध्ये श्रोत्यांना खिळवून ठेवले पंडित प्रसाद दुसाने यांनी
दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील पटेल कुटुंब व ओमकार सामाजिक व सांस्कृतिक मंडळ नांदगाव यांच्या वतीन मोहन पटेल यांच्या स्मरणार्थ सुरेल रागदारीवर आधारित पहाट पाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे शिष्य पंडित प्रसाद दुसाने यांनी आपल्या सुमधुर आवाजात विविध मराठी हिंदी व नाट्य संगितावर आधारित गिते, गझल सादर केल्या त्यांना गायिका अपर्णा माडीवाले, निलीमा अग्रवाल, उमेश शास्त्री देशपांडे यांनी साथ दिली. तर हार्मोनियम चेतन साठे, तबल्यावर कुणाल काळे यांनी साथ दिली. पहाटे पाच वाजता सुरू झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. यावेळी
गोविंद दामोदर …, सांज ये गोकुळी सावळी सावळी…, पाहिले न मी तुला तु मला न पाहिले…., आज जानेकी जिद ना करो…, आपकी आंखों में कुछ राज है।…, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते मन हे वेडे…, अधीर मन झाले…, होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज़ है।…, पल पल दिल के पास तुम रहती हो…, पायोजी मैंने राम रतन धन पायो …, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला…, कानडा राजा पंढरीचा…, माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझ्या… आदी सदाबहार गीते सादर केली कार्यक्रमाची सांगता निघालो घेऊन दत्ताची पालखी… दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गीताने करण्यात आली. शहरातील दर्दी रसिक श्रोत्यांनी भल्या पहाटे मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती. महिला श्रोत्यांची संख्या उल्लेखनीय होती.

