नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव येथील शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने दीपावली निमित्त गरजूंना दिवाळीचा फराळ व गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले.
शहरापासून जवळच असलेल्या ढासे मळा, जतपुरा रोड येथे आपल्या बहीण-भाऊंना दिवाळीची भेट म्हणून फराळ व गोड पदार्थ देण्यात आले. या प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी येथील रहिवाशांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेचे नूतन अध्यक्ष प्रकाश ढगे, उपाध्यक्ष नरेंद्र पारख, जगन्नाथ साळुंके, गरुड नाना, राजेंद्र दुसाने, वामनदादा पोतदार, बळवंत शिंदे, संजय पटेल, प्रसाद बुरकुल, सामाजिक कार्यकर्ते संजय मोकळ, सुमित गुप्ता, सुशिल बागुल, नारायण वाघ आदि पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन व कार्यक्रमाची रूपरेषा सुमित गुप्ता यांनी सांभाळली होती.
