loader image

“राष्ट्रीय आयुर्वेद दिवस” अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे उत्साहात साजरा

Nov 16, 2023


प्रतिनिधी : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , निमा न्यू नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी पूजन, तसेच राष्ट्रीय आयुर्वेद दिवस ,अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या शुभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अशोका समूहाचे चेअरमन श्री अशोक कटारिया, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , हृदयरोग तज्ञ डॉ सुधीर शेतकर ,सेंटर हेड डॉ सौरभ नागर , मार्केटिंग हेड पीयूष नांदेडकर , निमा न्यू नाशिकचे अध्यक्ष डॉ. दीपक चौधरी, सचिव डॉ प्रशांत वाणी , कोषध्यक्ष डॉ परीक्षित खाचणे व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
निमा न्यू नाशिक तर्फे यंदाचा मानाचा धन्वंतरी पुरस्कार डॉ. अनिल जाधव यांना देण्यात आला .दिडशे पेक्षा जास्त सभासदांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. स्वादिष्ट अल्पोपहार नंतर प्रत्येक सभासदास बहुमूल्य दिवाळी भेट अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे देण्यात आली .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजय पाटील व डॉ. अविनाश बाविस्कर व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे विपणन अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.