नांदगाव – नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील वाखारी
येथील किसान माध्यमिक विद्यालय वाखारी येथे १७ नोव्हेंबर २०२३रोजी विद्यालयाच्या आवारात सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आयोजकांनी उत्तम नियोजन करत २३ वर्षानंतर पुन्हा शाळा भरवली त्या क्षणाचा आनंद घेत/ देत शाळेतील साफसफाई पासून ते प्रार्थना, वर्गातील हजेरी ते शाळेची सुट्टी होईपर्यंत वर्गशिक्षक व विषय शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी या शालेय दिवसाचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थी आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत भाऊक मनाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांप्रती असलेला आदर व्यक्त करत शालेय जीवनातील आपल्या आठवणी प्रसंग सांगत आपले मनोगत व्यक्त केले
कडक स्वभाव व शिक्षकांच्या शिस्तप्रियतेचा फायदा मुलांना आयुष्यात कसा झाला, म्हणून या बॅचचे आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत, म्हणून आज खऱ्या अर्थाने घडलेले विद्यार्थी हेच शिक्षकांची संपत्ती आहेत असे
शिक्षक व विद्यार्थी व्यक्त झाले.
विद्यार्थ्यांबरोबरच वाखारी गावा सोबत आपली नाळ कशी घट्ट झाली, गावात आपले संबंध सर्वांसोबत कसे चांगले स्वरूपात होते, याबाबत सर्व शिक्षकांनी शाळा, विद्यार्थी व गावाप्रती आपले प्रेम व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या या स्नेह मेळाव्या मागील कल्पकता बघून आपण भारावून गेलो आहोत अशी प्रतिक्रिया देत शिक्षक व्यक्त होत होते. सर्वांनी स्नेहभोजन तसेच फोटो सेशन करत खूप खूप आनंद झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. १९९९/२००० बॅचच्या स्नेह मेळाव्याची आठवण म्हणून वृक्ष लागवड देखील करण्यात आली
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष विजय चोपडा सर हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते, विद्यार्थी जीवण ठाकरे व प्रदीप बोडके यांनी सूत्रसंचालन केले.
आपण सर्व मित्र यापुढे प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी राहून एकमेकांना नेहमी सहकार्य करू, मन मोकळे करण्यासाठी मित्र ही एकच जागा आहे अशा भावना व्यक्त करत, पुन्हा भेटू म्हणत कार्यक्रमाची सांगता केली.
